यशाची उज्वल परंपरा तुळजामाता इंग्लिश मेडीयम तुळजापूर येथे इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तुळजामाता विद्यालयाचा १०० % निकाल लागला आहे. विद्यालयातून एकूण ५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ४० विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.
विद्यालयातून प्रथम क्रमांक सिद्धी सतीश चव्हाण, द्वितीय क्रमांक सावली प्रकाश बनसोडे तर तृतीय क्रमांक आर्यन राजेश शिंदे यांनी पटकावला आहे. या विद्यार्थ्यांचा तुळजामाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. संभाजी भोसले व संस्थेचे सचिव धनंजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप, अंजली कोंडो, अश्विनी शिंदे आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता पेटकर, सूत्रसंचालन अश्विनी राजहंस तर आभार सोनाली कवठेकर यांनी मानले. कार्यक्रमाला बापूसाहेब अमृतराव, सतीश चव्हाण, राजेश शिंदे आदी पालकांसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत