बार्शी – येथील भगवंत मंदिरात सुरु असलेल्या प्रवचनमालेच्या सांगता समारंभात गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले प्रतिपदेला चिंतन करीत होते. दरवर्षीप्रमाणे सुरु असलेली ही श्रावणमास प्रवचनमाला या वर्षी १८ वर्षे पूर्ण करत आहे. या श्रावणमास प्रवचनमालेमध्ये गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले प्रतीवर्षी एका विषयावर चिंतन करत असतात. यावर्षी या प्रवचनमालेत संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान या विषयावर महिनाभर निरुपण केले गेले. संत तुकाराम महाराज महाराजांचे चरित्र म्हणजे भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले आहे. समाजातील सर्व घटकांना प्रिय असणारे हे चरित्र होय.
या सांगता समारंभाला पुन:स्मरणीय बनविण्यासाठी सर्वजण आहेत. परंतु, त्यामध्येही संदीप नागणे यांनी सर्व भाविकांचे लक्ष भगवंत मंदिराला केलेल्या आकर्षण फुलांनी केलेल्या सजावटीने वेधले होते. मंदिराच्या पुर्वद्वार तसेच पश्चिमद्वारासमोर काढलेली सुशोभित रांगोळी भाविकांसाठी चित्तवेधक होती. समारंभात सहभागी होण्यासाठी उत्सुक श्रोतावर्गाने ५ वाजल्यापासून मंदिरात गर्दी केली होती. शेवटी सद्गुरु प्रभाकरदादा आर्शीवचनात सांगितले की , संत तुकाराम महाराजांचे चरित्र सर्व प्रापंचिक माणसाला आर्शवत् मार्ग दाखवणारे आहे.त्यांच्या चरित्राकडे चमत्कारिक वृत्तीने न पाहता. त्यातून दिलेल्या बोधाचा मागोवा घेतला तर कल्याणाचा मार्ग मिळाल्याशिवाय राहत नाही.
सांगता समारंभात सद्गुरुदादा, सौ. भाग्यलक्ष्मी आई,गुरुवर्य डॉ.जयवंत महाराज यांच्या सुविद्य पत्नी सौ. आश्विनी बोधले, बंधू ह.भ.प.यशवंत महाराज बोधले हे आले होते.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीमध्ये ‘भक्तनिवास’ उभारणी लवकरच सर्व भाविकांच्या सेवेत असेल; त्यामुळे बाहेरगावच्या श्रोत्यांना प्रवचनमालेचा आनंद महिनाभर घेता येईल , असे सांगितले. माजी मंत्री दिलीप सोपल यांनीही प्रवचनमालेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बोधले परिवारातील सर्व बंधू, सुस्ते मंडळी अशा अनेकांनी आवर्जून उपस्थिती लावली.
बोधराज भक्त मंडळातील परंपरेवर नितांत प्रेम असणारे सोमनाथ ढगे, तुकाराम माने, अॅड. नितिन शिंदे,अमृत राऊत यांनी आवडीने जयवंत महाराजांना संत तुकाराम महाराजांसदृश पोषाख देऊन गुरुपुजन केले. त्याचबरोबर, या प्रवचनमालेत मोलाचे जबाबदारी स्विकारुन सेवा करणारे भगवंत देवस्थान ट्रस्ट सरपंच दिलीप बुडूख यांनीही सद्गुरु दादा, गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे पुजन केले. रविंद्र राऊत यांनी भाविकांना प्रसादवाटपाची सेवा केली.
प्रा. रजनीताई जोशी, श्री.मुकुंद कुलकर्णी यांनी आपली प्रवचनमालेविषयीची मनोगते व्यक्त केली. प्रा. जगदाळे यांनी यावेळी प्रवचनमालेची माहिती सांगितली. शेवट झालेल्या संत तुकाराम महाराजांच्या नामावलीने सर्व श्रोतावृंद प्रसन्न झाला होता.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन