Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे स्मारकासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्याची मागणी

जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे स्मारकासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्याची मागणी

जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचे स्मारकासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्याची मागणी
मित्राला शेअर करा

लिंगायत धर्म संस्थापक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी हजारो वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे जगातील पहिली लोकशाही संसद निर्माण केली. आणि समतेचा संदेश जगासमोर ठेवला. अशा थोर महापुरुषांचे राष्ट्रीय स्मारक ऐतिहासिक वारसा असलेल्या मंगळवेढयातच उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. व स्मारकाचा आराखडा तयार करून प्रशासकीय सनिंयत्रणासाठी स्मारक समिती गठीत केली होती.

स्मारक समितीचे अशासकीय सदस्य म्हणून डाॅ. बसवराज बगले आणि श्री. तुकाराम कुदळे यांनी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे विनंती केली होती. व त्याबाबत जलद गतीने पाठपुरावा करून स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून प्रशासकीय कामकाजाला गती आणली आहे. त्यानुसार मा. तहसिलदार आणि मा. उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा यांच्याकडून सरकारी जमीनीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मागविलेला होता.
सदर अहवालात महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी मंगळवेढ्यातील सरकारी जमीन गट क्रमांक 2686 याचे क्षेत्रफळ 18 हेक्टर 24 आर. म्हणजेच 45 एकर इतकी जमीन शासकीय उपक्रमाच्या या स्मारक समितीकडे वर्ग करण्याबाबतचा सकारात्मक अहवाल विहित नमुन्यात दाखल झाला असून सोलापूर जिल्हा महसूल प्रशासनाच्या सकारात्मक अहवालानुसार सरकारी जमीन स्मारक समितीच्या नावे वर्ग करण्याची प्रशासकीय कार्यवाही चालू आहे.


जागा हस्तांतरीत झाल्यानंतर स्मारकाशी निगडीत अनुषंगिक विकास कामे, बांधकाम आणि बागकाम तसेच स्मारकाचा आराखडा या बाबतच्या खर्चाची तरतूद करावी लागेल, त्यासाठी येत्या 2022- 23 च्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात ” जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी ” रक्कम रूपये ५०० कोटींची आर्थिक तरतूद करावी.ही संपूर्ण लिंगायत समाजाची मागणी आहे. याविषयी कार्यवाही करण्याचे निर्देश आपण वित्त व नियोजन विभागास द्यावेत अशी विनंती महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समिती, मंगळवेढा चे अध्यक्ष डाॅ. बसवराज बगले यांनी केली आहे.