दैनिक प्रभास केसरी गुणगौरव पुरस्कार 2022 वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका श्री. विलास कानडे यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सत्कार मुर्ती श्री. उत्तम विलास रामगुडे यांना भारतीय सशस्त्र सेना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच दैनिक प्रभास केसरी गुणगौरव पुरस्कार 2022 सौ मनिषा उत्तम रामगुडे यांना प्रदान करण्यात आला
श्री उत्तम विलास रामगुडे यांनी वीस वर्षे भारतीय सशस्त्र सेवेत कार्यरत राहून दुर्गम भागात आपल्या जीवाची पर्वा न करता मातृभूमीच्या रक्षणासाठी उल्लेखनीय सेवा बजावली या प्रदीर्घ सेवेनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत आहेत त्यांच्या या कार्याबद्दल भारतीय सशस्त्र सेना उत्कृष्ट सेवा गुणगौरव पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सौ. मनीषा उत्तम रामगुडे या अंगणवाडी सेविका असून उत्कृष्ट सेविका सन्मान प्राप्त झाला असून वृक्षारोपण, बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती, कोविड 19 काळातील उल्लेखनीय कार्य, वडार समाज नॅशनल कॉन्फरन्स, पोस्टर प्रदर्शन, पुणे येथे सारथी यूथ संस्था व्यसनमुक्ती कार्यक्रम, किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीर, रक्तदान शिबीर, 8 मार्च महिला दिनानिमित्त आहार प्रात्यक्षिक कार्यक्रम स्पर्धा व विविध उपक्रमांचे आयोजन व उल्लेखनीय सहभाग त्यांनी घेतला आहे.
याचबरोबर मनीषा रामगुडे यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार 2016,
वॉटर कप स्पर्धा 2017,
2018 साली सावित्रीबाई फुले वीरांगना नॅशनल अवॉर्ड देऊन दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले, 2022 चा पुणे समाज गौरव पुरस्कारही प्राप्त करून झाला आहे.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत