Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > जगदाळे मामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

जगदाळे मामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

जगदाळे मामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
मित्राला शेअर करा

जगदाळे मामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 मे रोजी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीने दुसरा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यामध्ये संस्थेतील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी सदस्यांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी यांनी केलेले आहे तरी सर्व सदस्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

30 मे रोजीच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाचे नियोजन खालील प्रमाणे केलेले आहे सकाळी 8 ते 9 जगदाळे मामा यांच्या पुतळ्यास अभिवादन व पुण्यतिथीचा कार्यक्रम नंतर 9 ते 9:30 जगदाळे मामा हॉस्पिटल मधील ट्रॉमा सेंटरला भेट व तेथील कॉन्फरन्स हॉलमध्ये ट्रॉमा सेंटर विषयी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी. वाय. यादव व हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर आर व्ही जगताप व संस्थेचे सचिव श्री पी टी पाटील यांचे मार्गदर्शन नंतर 9;30 ते 12:30 या वेळेत नाव नोंदणी व सर्व रोग तपासणी शिबीर व त्यानंतर शिशु संस्कार केंद्र याठिकाणी क्रेडिट सोसायटी यांच्यातर्फे जेवणाचा कार्यक्रम असणार आहे.