Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > जन औषधी केंद्र – केंद्र सरकारची योजना अल्प गुंतवणुकीत औषध विक्री केंद्र

जन औषधी केंद्र – केंद्र सरकारची योजना अल्प गुंतवणुकीत औषध विक्री केंद्र

मित्राला शेअर करा

जन औषधी केंद्र सुरू करा आणि पैसे कमवा – पहा कशी आहे केंद्र सरकारची योजना

प्रधान मंत्री भारतीय जनऔषधि प्रकल्प ही भारत सरकारच्या फार्मास्यूटिकल्स विभागाने सुरू केलेली मोहीम आहे , ही योजना महत्वाची असल्याने आपण समजून घेऊ.

तर या औषध केंद्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणार्‍या किंमतीत दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे हा या अभियानाचे उद्देश आहे.

जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर जन औषधी केंद्र हा एक चांगला पर्याय असू शकतो – यामध्ये तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते.

जन औषधि केंद्र कोण उघडू शकते


जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित व्यक्ती डी फार्मा किंवा बी फार्मा पदवीधारक असने गरजेचे आहे

तसेच कुणीही व्यक्ती, हॉस्पिटल, फार्मासिस्ट, डॉक्टर, मेडिकल प्रॅक्टिशनर यासाठी अर्ज दाखल करू शकतात.

जनऔषधि केंद्र उघडण्यासाठी असा करा अर्ज

यासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाइनही अर्ज करू शकता

दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत लिंकला भेट द्या व होम बटन क्लिक करा

janaushadhi.gov.in

तसेच सविस्तर माहितीसाठी आपण [1800180 8080】या नंबर वर कॉल करून मदत घेऊ शकता

यामध्ये इन्कम कसे मिळणा


केंद्र सरकारच्या वतीने जनऔषधि केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला अडीच लाख रुपयांची संपूर्ण मदत मिळेल

तसेच या केंद्रांवर आपल्याला औषध सेलमधून 20 टक्के नफा मिळतो याव्यतिरिक्त आपल्याला दरमहा 15 टक्के प्रोत्साहन राशि देखील मिळेल

दरम्यान प्रोत्साहन कमीत कमी 10 हजार रुपये देण्यात येते तसेच ही रक्कम तुम्हाला अडीच लाख रुपये पूर्ण होईपर्यंत मिळते

जन औषधी केंद्र एक चांगला व्यवसाय होऊ शकतो सविस्तर माहितीसाठी हेल्पलाईनला कॉल करा.

काही फसवणूक करणाऱ्या बनावट वेबसाईट्स देखील कार्यरत आहेत त्यामुळे अर्ज करताना केंद्र शासनाच्या http://janaushadhi.gov.in

या अधिकृत वेबसाईट वर होम बटन क्लिक करून अर्ज करावा.