पुणे : लोणी काळभोर येथील एका नामांकित महाविद्यालयातील महिला शिपायांची पॉस्को आणि विनयभंगाच्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली .
परीक्षा केंद्रावर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अश्या परिस्थितीला सामोरे जावे लागते त्यामुळे ॲड. सचिन – पाटील झालटे यांचा युक्तिवाद व कोर्टाने दिलेला निर्णय परीक्षांशी संबंधित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनोधर्य वाढवणारा मानावा लागेल.
विशेष न्यायालयातील जहागीरदार कोर्टाने हा निकाल दिला . बारावीची परीक्षा कॉपीमुक्त चालावी म्हणून बारावी बोर्डाने संबंधित महाविद्यालयाला चालविण्यास परीक्षा केंद्र सांगितले होते . त्याप्रमाणे २१ फेब्रुवारी २०१८ रोजी इंग्रजी विषयाच्या पेपर दरम्यान कॉपीवर आळा घालण्यासाठी विद्यालयातील दोन महिला शिपाई यांना परीक्षा केंद्रावर सहाय्यक म्हणून नियुक्त केले होते . या महिला शिपाई कर्मचारी परीक्षा हॉलच्या बाहेर येणाऱ्या विद्यार्थिनींना अंगझडती करत आतमध्ये सोडत होत्या . त्या दरम्यान एका विद्यार्थिनीस महिलांनी कॉपीच्या संशयावरून बंदिस्त रूममध्ये नेऊन तिच्या टॉप तसेच तिचे कपडे काढायला लावून अंगझडती घेतली होती .
त्यामुळे पीडित मुलीस मनाला लज्जा उत्पन्न झाल्याने तिने लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे वरील महिला शिपाई यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा १४ जून २०१८ रोजी दाखल केला होता . इतर मुलींनाही अशाच पद्धतीने तपास केल्याचे तपासी अधिकाऱ्यांना तपासात निष्पन्न झाले होते .
ॲड. झालटे यांचा युक्तिवाद
मुलींची झडती तपासणी कक्षातच केलेली
■ आरोपींनी सचिन झालटे – पाटील यांच्यामार्फत दोष सिद्धीपूर्वीच मुक्तता करण्यासाठी विशेष न्यायालयातील जहागीरदार कोर्ट यांच्या न्यायालयात अर्ज केला होता . आरोपींचे कृत्य हे विनयभंग या सदरात मोडत नसून महिला आरोपींनी पीडित मुलींची तपासणी ही सार्वजनिक ठिकाणी न करता तपासणी कक्षात केलेली आहे .
■ तसेच आरोपींनी पीडित मुलींच्या तपासणी वेळी हात लावण्याची कृती ही कॉपी तपासण्यासाठी अनिवार्य होती . त्यामध्ये मुलींचा विनयभंग करण्याचा कोणताही उद्देश अथवा हेतू नव्हता , असा युक्तिवाद केला .
■ तसेच आरोपींच्या वकिलांनी विमानतळावर संशयितांची तपासणी करताना अशा पद्धतीने अंगावरील कपडे तपासणी कक्षात उतरविण्यास सांगतात , याचे उदाहरण दिले . तसेच आरोपींच्या वकिलांनी यासंदर्भातील एचएससी बोर्डाची निर्देशित तपासणी नियमावलीदेखील सादर केली होती .
हा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने आरोपींची दोषातून मुक्तता केली .
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान