बार्शी : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 121 व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत जिजामाता विद्यामंदिर बार्शी मधील विद्यार्थिनींचे यश. यशस्वी विद्यार्थिनींना संस्थेचे खजिनदार मा. श्री.जयकुमार शितोळे साहेब यांच्या शुभहस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे आहेत.कु. पृथा ठोंबरे बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक , कु. मुग्धा शिंदे सामान्यज्ञान स्पर्धेत तृतीय क्रमांक, कु. प्रांजल मोरे कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कु. रिद्धी मुळे वैयक्तिक नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कु. ईश्वरी मोरे वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कु. रंजना माने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कु. अंजली घेंबाड निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कु.अदिती मांगडे निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक,कु. समीक्षा सोनटक्के हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कु. ऋतुजा दुधाळ चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक, कु. शुभ्रा माने व प्रांजल मोरे विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक, समुह नृत्य स्पर्धेत जिजामाता विद्यामंदिर, बार्शी प्रथम क्रमांक आला.
समूह नृत्य स्पर्धेत काव्या पवार, अपेक्षा लावंड, अलिना शेख, सलोनी शिंदे, मुग्धा शिंदे, रिद्धी मुळे, सायली व्हनकळस, ईश्वरी पानगावकर, आरोही शहाणे, पद्मजा घुटे, संध्या, संस्कृती या विद्यार्थ्यांनीचा सहभाग होता.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी. वाय. यादव उपाध्यक्ष मा. नंदन जगदाळे साहेब, सचिव पी. टी. पाटील साहेब, सहसचिव ए. पी. देबडवार खजिनदार जयकुमार शितोळे , संस्थेचे सर्व विश्वस्त व सर्व पदाधिकारी, प्रशासन अधिकारी मा. अनिल बनसोडे साहेब, पर्यवेक्षक संजय पाटील तसेच शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सर्वाना मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती पांडे मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक यांच्याकडून अभिनंदन व खूप खूप कौतुक होत आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!