Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > व्हिडीओ > जीवघेणी थंडी थोडी थोडकी नाही उणे चाळीस तापमान, त्याठिकाणी जवानांनी फडकावला राष्ट्रध्वज तिरंगा

जीवघेणी थंडी थोडी थोडकी नाही उणे चाळीस तापमान, त्याठिकाणी जवानांनी फडकावला राष्ट्रध्वज तिरंगा

मित्राला शेअर करा

26 जानेवारी म्हणजेच भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन. 73 वा प्रजासत्ताक दिन देशभरात थाटामाटात साजरा केला गेला. त्यामुळे सध्या सगळीकडे प्रजासत्ताक दिनाची उत्सुकता आणि जल्लोष पहायला मिळाली.

अमृत महोत्सव दिनी अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आपण पाहिले.

मागील काही दिवसांपासून देशात थंडीची लाट सुरू आहे व तापमानात प्रचंड घट झाली याचा अनुभव आपण घेत आहोत. परंतु देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी उणे तापमान चोवीस तास खडा पहारा देत असणाऱ्या जवानांचा आपण विचार करतो का.

सध्या कोरोनाचा कहर असल्यामुळे कोरोना नियमांचं पालन करुन सगळीकडे प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सगळी काळजी घेत असल्याचं पहायला मिळाले

अशातच आपले भारतीय जवान देशासाठी सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात आपल्या जवानांनी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस ‘हिमवीर’ उत्तराखंडमधील औली येथे 11,000 फूट उणे 20 अंश सेल्सिअस तापमानात देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावत 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला.

तर दुसरीकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जवानांनी लडाखमध्ये 15 हजार फूट उंचीवर उणे 40 डिग्री तापमानात तिरंगा फडकावला आणि राष्ट्रगीत गायल. एवढ्या जीवघेण्या थंडीतही आपले भारतीय जवान देशासाठी सीमेवर लढत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशात 16 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावत इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस ( ITBP ) च्या जवानांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. त्यामुळे सध्या भारतीय जवानांवर अभिमान होत असून त्यांच्यावर कौतूकांचा वर्षाव होत आहे अणि हे दृश्य पाहून आपल्या अंगावर थंडी मुळे नाही तर अभिमानाने शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.