Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शंभर जणांचा सहभागव्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी शाखेचा उपक्रम

पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शंभर जणांचा सहभागव्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी शाखेचा उपक्रम

पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिरात शंभर जणांचा सहभागव्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी शाखेचा उपक्रम

बार्शी : येथील व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शहर शाखेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शंभर जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शनिवार दिनांक १६ रोजी श्री वर्धमान जैन स्थानक,सोमवार पेठ,बार्शी येथे हे शिबीर संपन्न झाले.

या आरोग्य तपासणी शिबिरात पत्रकारांची नेत्र तपासणी, रक्ताच्या तपासणी यात हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल प्रोफाइल, लिव्हर प्रोफाइल, थायरोइड , किडनी, व डायबेटीसच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच ई.सी.जी. व ब्लड प्रेशर, इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.

व्हॉईस ऑफ मीडिया चे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव गणेश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे, शहर अध्यक्ष हर्षद लोहार, सचिव जमीर कुरेशी, उपाध्यक्ष विजय शिंगाडे, खजिनदार प्रवीण पावले, मयूर थोरात, अस्लम काझी, आदी उपस्थित होते.

या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.शीतल बोपलकर, आनंद ऋषिजी नेत्रालय,नगरचे डॉ.भाऊसाहेब आदमाणे, महालॅबचे पंडित कागणे, युसुफ जमादार, श्री वर्धमान जैन स्थानकचे अध्यक्ष जयचंद सुराणा, दैनिक, साप्ताहिक, डिजिटल माध्यमातील पत्रकार संघटना, आदींचे सहकार्य लाभले.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्लिकार्जुन धारूरकर, प्रदीप माळी, समाधान चव्हाण, शाम थोरात, निलेश झिंगाडे, ओंकार गायकवाड, सागर गरड, राहुल भालशंकर यांनी परिश्रम घेतले.