Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > जंगलतोड व हवामान बदल जनजागृती कार्याबद्दल (UK) ब्रिटनमध्ये झाला भारतीय चिमुकलीचा सन्मान

जंगलतोड व हवामान बदल जनजागृती कार्याबद्दल (UK) ब्रिटनमध्ये झाला भारतीय चिमुकलीचा सन्मान

मित्राला शेअर करा

वाढती लोकसंख्या तसेच वाढत्या गरजा यामुळे अनेक ठिकाणी वृक्षतोड केली जाते. तर कालांतराने जंगलतोड ही मोठ्या प्रमाणात होत आहे. याकरिता पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये.

यासर्व गोष्टीं कुठे तरी थांबल्या पाहिजे म्हणून अनेक ठिकाणी अनेकजण जनजागृती करत असतात. अशातच युकेमध्ये जंगलातोड आणि हवामान बदलावर होणारा परिणाम यावर सतत जागरूकता करत प्रयत्न केल्याने एका सहा वर्षीय भारतीय मुलीला बोरिस जॉन्सनचा(PM) डेलि पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार देण्यात आला आहे.


अलेशा गाढिया या सहा वर्षांच्या भारतीय मुलीला ब्रिटिश पंतप्रधान (pm) बोरिस जॉन्सनचा डेलि पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर अलेशा ही ब्रिटिश पीएम पॉईंट्स ऑफ लाइट पुरस्कार प्राप्त करणारी १,७५५ वी व्यक्ती ठरली आहे. तसेच जी लोक समाजात चांगली जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी मान्यता व सन्मान देण्याकरिता २०१४ मध्ये हा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आलीय, अशी माहिती यावेळी पीटीआय (PTI)ने दिली आहे.
तसेच अलेशा ही युनायटेड किंग्डम (यूके)-आधारित नॉन- प्रॉफिट ऑर्गनायझेशन कूल अर्थ (non-profit organisation cool earth) या संस्थेची मिनी- ॲम्बेसिडर आहे. जी वर्षावन समुदायांबरोबर जंगलतोड थांबवण्यासाठी काम करते आणि व्यवसायांना अधिक टिकाऊ पद्धतीने विकसित करण्यास उद्युक्त करत असते. तसेच अलेशाने कूल अर्थसाठी ३००० पाउंड पेक्षा अधिक पाउंड गोळा केले आहेत.

अलेशा गढिया बद्दल अधिक जाणून घ्या


जंगलतोड रोखण्यापासून ते कचरा उचलण्यासारख्या उपक्रमांसह इतरांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात अलेशाने तिच्या शाळेत हवामान बदल हा एक क्लब देखील सुरू केला आहे. तसेच अलेशाने यूकेच्या काही मोठ्या कंपन्या आणि प्रभावशाली व्यक्तींना शेकडो पत्रे आणि ईमेल पाठवून हवामानविषयक कारवाई करण्यास सातत्याने त्यांना प्रोत्साहित केले.

२०२१च्या सुरुवातीला अलेशाने ‘जस्ट गिविंग’ ऑनलाइन फंडरेझर पेज सुरू केले. ज्यात तिने ८० किमीच्या स्कूटर चॅलेंजसह कूल अर्थसाठी३,४०० पाउंड(GBP) उभे केले. या चॅलेंजला क्वीन एलिझाबेथ द्वितीय आणि पर्यावरणवादी डेव्हिड ॲटनबरो यांचे मार्गदर्शन मिळाले.
पर्यावरणाच्या या वाढत्या समस्येकडे पाहता अलेशाने हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगून तिने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच या बद्दल समाजात जागरूकता वाढवण्यासाठी अनेक समस्येचा सामना करावा लागत असल्याचं तिने संगितले.

अलेशाची प्रतिक्रिया:

“पुरस्कार जिंकल्याबद्दल मला खरोखर उत्साह आणि आनंद वाटतो.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पुरस्कार आणि मला पत्र लिहायला मिळाल्याबद्दल मी खरोखर कृतज्ञ आणि सन्मानित आहे. मला असे वाटले नव्हते की मला असा पुरस्कार मिळेल.

शिक्षकांचे मानले आभार

हवामान बदल हा खरोखर महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला आशा आहे की जागरूकता वाढवल्याने या समस्येचा सामना होईल. माझ्या शिक्षिका श्रीमती हीटली आणि श्रीमती वंडंड यांच्यासह ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या सर्वांचे आभार. मला त्यांचे पहिले युवा राजदूत बनवल्याबद्दल कूल अर्थचेही आभार. ”

यावेळी अलेशाचे आई -वडील किरण आणि पूजा गढिया म्हणाले की, त्यांना तिचा खूप अभिमान आहे. “तिने गेल्या वर्षभरात इतक्या तरुण व महान व्यक्तींसाठी या उपक्रमाबद्दल खूप काही केले आहे,” याचबरोबर अलेशा प्रत्येकासाठी प्रेरणा बनली आहे. तिच्या हे महान कार्य चालू ठेवण्यासाठी तिला यावेळी शुभेच्छा दिल्या.