Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > के.एन. भिसे कॉलेज, भोसरे येथे प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ व गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न

के.एन. भिसे कॉलेज, भोसरे येथे प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ व गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न

के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर, भोसरे येथे रविवार दि. ०६ मार्च २०२२ रोजी प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ व परिपूर्ति गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला.
मित्राला शेअर करा


या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून माढा-करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय संजय मामा शिंदे उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आमदार विनायकराव पाटील तथा बापू यांनी भूषविले होते. प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे सचिव श्री. बाळासाहेब भिसे हे उपस्थित होते.


प्रमुख पाहुणे संजय मामा शिंदे यांनी त्यांच्या या महाविद्यालयातील विद्यार्थिदशेपासून आज पर्यंतच्या महाविद्यालयाच्या जडणघडणीचा आढावा घेतला व त्यांचे गुरू प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील साहेब सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देऊन भावी आयुष्यासाठी मनोकामना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्र.कुलसचिव प्रा. डॉ. सुरेश पवार, सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, सोलापूर जिल्हा प्राचार्य फोरम चे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. जमादार, महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास, विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी चे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी चे माजी प्राचार्य डॉ. धुत्तुरगावकर एस. सी., सिल्वर जुबली हायस्कूल बार्शी चे मुख्याध्यापक प्रा. प्रशांत कोल्हे तसेच महाविद्यालयातील आजी-माजी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्यावतीने डॉ. आर. आर. पाटील साहेब यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील साहेब यांच्या परिपूर्ती गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. आर.आर. पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली. आपल्या सत्काराला उत्तर देत असताना प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या जडणघडणीत तसेच विकासात त्यांचे जे योगदान आहे त्याचा आढावा घेतला.
अध्यक्षीय समारोपात माननीय विनायकरावजी पाटील यांनी प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील साहेब यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी ४१ वर्ष दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रशांत तांबिले यांनी केले तर. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सचिन लोंढे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुल कदम व प्रा. गवळी मॅडम यांनी केले. स्नेहभोजना नंतर हा कार्यक्रम संपन्न झाला.