Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महिला दिनानिमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी आयोजित सन्मान सोहोळा व आरोग्य तपासणी शिबीर

महिला दिनानिमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी आयोजित सन्मान सोहोळा व आरोग्य तपासणी शिबीर

ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी आणी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या सयुक्त विद्यामाने जागतिक महीला दिनानिमीत्त कतृत्वान महीला सन्मान आणी मोफत महीला आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते
मित्राला शेअर करा

जागतिक महीला दिनानिमीत्त या कार्यक्रमासाठी शिवाजी महाविद्यालय बार्शी प्राचार्य प्रा. डाॅ. सौ. भारती रेवडकर, पोलीस उपनिरीक्षक बार्शी शहर सौ सारिका गटकुळ,एम आय टी व्ही जी एस च्या प्रिन्सीपल सौ रेखा पाटील , सी एच ओ समुदाय आरोग्य अधिकारी सौ रोहीणी अबजुर मुल्ला,हेड काॅन्स्टेबल बार्शी शहर सौ सिंधु देशमुख , बार्शी बीट अंगणवाडी सुपरवायझर सौ शबीस्ता जमादार, डब्लु पी एन कुर्डुवाडी च्या रेश्मा कदम या कतृत्ववान प्रमुख महीलांचा सन्मान करण्यात आला.

याचबरोबर कोवीड काळात योगदान दिलेल्या आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, डाॅक्टर, सफाईकामगार, समाजसेविका, खेळाडु, वकील, अशा महीलांचा सन्मान केला. तसेच याच दिवशी ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी आणी बार्शी शहरी आरोग्य अभियान यांच्या सयुक्त विद्यमाने महीलासांठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबीरात महीलांना औषधे, गोळ्या मोफत वाटप करण्यात आल्या. महीलांना चेक केल्यावर औषधे देण्यात आले तसेच महिला घरी जाताना त्यांना चीक्की मोफत वाटप करुन त्यांना गुलाब पुष्प देवुन त्याचा सत्कार केले. हा कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी ढगे साहेब आणी सानवणे साहेबांच्या सर्व स्टाफच्या माध्यमातुन विशेष सहकार्य लाभले.

या शिबीरात २०६ महीलांची आरोग्य तपासणी करण्यात आली या उपक्रमासाठी महीलांनी भरघोस प्रतीसाद दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर विजयजी दिवाणजी,नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते अजय तिवारी, वैभव उकीरडे, बिभीषण अवताडे, सूनिल नवले, प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरगूळे, गणेश कदम सर, सागर घंटे, गणेश गळीतकर, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार यांचे परीश्रम लाभले तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये कोमल वाणी, सायरा मुल्ला, माधुरी वाणी, रेखा सुरवसे ( विधाते) , रागीनी झेंडे,सारीका जाधवर, सिमा तांबारे, कोमल काळेगोरे, कोमल कोठावळे, कोठावळे ताई, रेखा वराडे लक्ष्मी मोहीते, नंदा कुलकर्णी, रेखा सरवदे, इ महीला सदस्य आणि ओन्ली समाज सेवा समीतीचे सर्व सदस्य यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूञसंचलन राजश्री निंबाळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी केले.