बार्शी : कै सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ कुलदैवत फार्म यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या जाणीव फाउंडेशन, जय शिवराय प्रतिष्ठान, त्रिमूर्ती प्रतिष्ठान, ऍनिमल फ्रेंड्स आर्यन क्रीडा व संशोधन संस्था मंडळ, उद्योजक रवीआण्णा राऊत, सतीश देशपांडे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सचिन वायकुळे, संत मन्मथ शिरोमणी सेवा मंडळ, ओन्ली समाजसेवा संस्था, माधवराव देशमूख, यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती कुलदैवत फार्म चे अध्यक्ष राहुल काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवार दि १२ रोजी सकाळी साडे दहा वाजता, कुलदैवत नागणे प्लॉट परंडा रोड बार्शी काळे निवासस्थानी शहर पोलीस स्टेशनचे पोनि बालाजी कुकडे, ग्रामीणचे पोनि दिलीप ढेरे, सह दुय्यम निंबधक ए. एस. बनसोडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. अरुण देबडवार, माजी शिक्षणाधिकारी शिवदास नलावडे, तसेच जेष्ठ पत्रकार संतोष सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये काळे यांच्या निवासस्थानी पुरस्कार वितरण होणार आहे व त्यानंतर लगेच महाप्रसाद कार्यक्रम चालू होईल तसेच त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता सामूहिक जागरण गोंधळ, तरी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन राहुल काळे यांनी केले आहे.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार