डिसेंबर महिन्याच्या अखेर करमाळा नगरपालिकेची मुदत संपत आहे . त्यानुसार राज्य निकवडणुक आयोगामार्फत दिलेल्या आदेशानुसार नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना 30 नोव्हेंबरपूर्वी तयार करण्यात आली आहे .ही प्रारूप प्रभाग रचना आराखडा सादर करण्यात आला असून यामध्ये १० प्रभाग आहेत . ही प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे .
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर , बार्शी , करमाळा , मंगळवेढा , कुर्डुवाडी , अक्कलकोट , दुधनी , मैंदर्गी व सांगोला या नगरपालिकांच्या मुदती सुद्धा संपत आहेत या अनुषंगाने प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे.
सध्या नगरपंचायतीची निवडणूका सुरू आहेत .यामध्ये जिल्ह्यात पूर्वीच्या व नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून नंतर नगरपालिकांच्या निवडणूका होतील या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून तयारी सुरु आहे . साधारण फेब्रुवारीमध्ये ते मार्च निवडणुका होतील असे बोलले जातआहे. प्रारूप प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर होईल .
अ वर्ग नगरपालिकासाठी निवडून आलेल्या नगरपालिका सदस्य संख्येत वाढ होणार आहे . तसेच अ वर्ग नगरपालिकेमध्ये किमान सदस्य संख्या ४० असेल आणि ४५ पेक्षा अधिक नसेल . ब वर्ग नगरपालिकेसाठी निवडून आलेल्या नगरपालिकेच्या सदस्य संख्येत दोनची भर पडणार आहे . ब वर्ग नगरपालिकेसाठी किमान सदस्य संख्या 25 असेल आणि ३५ पेक्षा अधिक नसेल . क वर्ग नगरपालिका निवडून आलेल्या सदस्यसंख्या तीनने वाढली आहे . क वर्ग नगरपालिकेसाठी किमान सदस्य संख्या २० असेल आणि 25 पेक्षा अधिक नसेल .
करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली असून १० प्रभागांमध्ये २० सदस्य संख्या असणार आहे.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.
हनुमान विद्यामंदिर, कव्हे ची यशाची परंपरा कायम