Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न
मित्राला शेअर करा

शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न झाला.

लाइव्ह व्हिडीओ

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळ, लातूरचे सुधाकर तेलंग व शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग, लातूर चे डॉ. गणपतराव मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा श्री.शि. शि. प्र. मंडळ बार्शी चे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव होते. त्याचबरोबर संस्थेचे सचिव पी.टी.पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, संस्थेचे सहसचिव ए. पी. देबडवार, संस्थेचे खजिनदार जे.सी.शितोळे तसेच संस्था सदस्य सी. एस. मोरे, व्ही. एस. पाटील, डी. एस. रेवडकर, डी. एम. मोहीते, बी. के. भालके, डॉ. एस. सी. माने, डॉ. यू. एन बोराडे, पी. बी. लोखंडे, एस. बी. शेळवणे हे उपस्थित होते.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव पी. टी. पाटील म्हणाले गेली ९० वर्षे या संस्थेचा विस्तार वाढवण्यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षक केवळ शिक्षकी पेशा करत नाही तर तो अनेक पिढ्या घडविण्याचे कार्य करत असतो तसेच संस्थेतील विविध शाखांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती दिली. संस्थेचे खजिनदार जे. सी. शितोळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी संस्थेमधील शिक्षक, लिपिक, सेवक,आदर्श शाळा व आदर्श शाखाप्रमुख यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमध्ये विविध शाखा मधील शिक्षकांमधून संतोष उद्धव माने (बाल संस्कार केंद्र,वाशी. – प्राथमिक विभाग), समाधान विठ्ठल बेदरे (कर्मवीर विद्यालय चारे- माध्यमिक विभाग), बळवंतराव सतीश शिवाजी (महाराष्ट्र संत विद्यालय तेर- माध्यमिक विभाग), हनुमंत दशरथ काळे (बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी-वरिष्ठ विभाग), डॉ. संजय बळीराम करंडे (बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी- वरिष्ठ विभाग), डॉ. व्ही. पी. शिखरे (शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी), उत्कृष्ट मुख्याध्यापिका -श्रीमती कविता दादाराव धावणे (महाराष्ट्र विद्यालय बार्शी), उत्कृष्ट प्राचार्य – डॉ. रत्नदीप यादवराव सोनकांबळे (राजश्री शाहू लॉ कॉलेज ,बार्शी), उत्कृष्ट शाखा पुरस्कार महाराष्ट्र विद्यालय बार्शी, शिक्षकेतर कर्मचाऱ्या मधून गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून अजित सुरेश सुरवसे (कर्मवीर विद्यालय चारे) व विश्वास कदम (श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी) या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

मुख्याध्यापिका कविता धावणे महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांनी सत्काराला उत्तर देताना हे यश केवळ माझे नसून ते माझ्या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आहे असे मत व्यक्त केले.


डॉ. गणपतराव मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक हा विद्यार्थ्यांचा गुरु आहे. शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचे भंडार वाढवले पाहिजे. वर्गावर जाताना शिक्षकांनी नेहमी तयारीने जावे असे मत व्यक्त केले.

सुधाकर तेलंग यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक मित्र असून शिक्षकाने अध्यापनामध्ये विविध पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

अध्यक्ष समारोप करताना डॉ. बी. वाय. यादव यांनी संस्थेतील सर्व शिक्षकांनी मुलांना ज्ञान देण्याबरोबरच संस्काराचे धडे दिले पाहिजे असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण गाढवे व डॉ. आसावरी फरताडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहसचिव ए. पी. देबडवार यांनी केले.