कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यालय बार्शी मध्ये शाळा अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अश्या दोन गटात घेण्यात आल्या.
या स्पर्धेत
प्राथमिक गटात
प्रथम क्रमांक – उद्यानंद सोमनाथ दळवी
द्वितीय क्रमांक – हरिष उत्तम कावरे
तर प्राथमिक मध्ये उत्तेजनार्थ
पियुष पवन माने
आदिती रवींद्र पाटील
अजय अनिल वैद्य
माध्यमिक गटात
प्रथम क्रमांक -पृथ्वीराज जयसिंह चंदेले
द्वितीय क्रमांक – योगेश्वर महारुद्र जाधव
तर उत्तेजनार्थ मध्ये
सोहम सूर्यकांत सोनार
अमित बालाजी क्षिरसागर
अजिंक्य संजय बारसकर
प्राथमिक व माध्यमिक गटातून १ व २ क्रमांकास ट्रॉफी,भेटवस्तू सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ तर उत्तेजनार्थ खेळाडूंना भेटवस्तू सर्टिफिकेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हे सत्कार नगरपालिका बार्शी प्रशासन अधिकारी श्री अनिल बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले सोबत प्राचार्य जी. ए. चव्हाण ,श्री सापताळे सर, सर्व विद्यार्थी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी प्राथमिक गटातून ४० तर माध्यमिक गटातून ६० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त आयोजित या स्पर्धा दयानंद रेवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आल्या. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अतुल नलगे,अविनाश जाधव, जयदीप चव्हाण यांचे सहकार्य लाभले. सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेच्या व प्राचार्य जी. ए. चव्हाण यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
More Stories
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड