Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > महाविद्यालये सुरू राहणार की बंद या निर्णयावर काय म्हणाले मंत्री उदय सामंत

महाविद्यालये सुरू राहणार की बंद या निर्णयावर काय म्हणाले मंत्री उदय सामंत

मित्राला शेअर करा

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे त्यात भर म्हणजे ओमीक्रॉन चे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे असे मंत्र्यांकडून अणि शासकीय अधिकाऱ्यांकडून सुद्धा बोलले जात आहे त्यामुळे राज्यातील शाळा, कॉलेज पुन्हा बंद करण्यात येणार का अश्या चर्चा होऊ लागल्या आहेत, व विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रश्न निर्माण होतो आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रातात ओमिक्रॉन दुप्पट वेगाने वाढत आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला याचा विचार करावा लागेल. येत्या 3 तारखेला कुलगुरूंची एक बैठक होणार आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून जो अहवाल येईल. त्यावर मुख्यमंत्र्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्य सामंत यांनी राज्यातील अकृषी विध्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मुंबईसह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालय सुरु ठेवायचे की नाही, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाने पुन्हा एकदा संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडू शकते अश्या चर्चा सुरू आहेत कॉलेज संदर्भात काय निर्णय घ्यायचा पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी बैठक घेतल्याचं कळतंय.