या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य श्री किरण पाटील सर व प्रमुख पाहूणे प्रगतशील शेतकरी श्री. तुळशीदास तुकाराम गव्हाणे होते अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांच्या शुभहस्ते डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या कार्यशाळेत कृषी अधिकारी श्री. सयाजीराव गायकवाड यांनी उन्हाळ्यातील पिकांचे पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले तसेच प्रगतशील शेतकरी श्री तुळशीदास गव्हाणे यांनी सेंद्रीय शेती व आपले आरोग्य या विषयी माहिती सांगितली तसेच काटेगाव मधील शेतकरी श्री . इब्नेखालीद पठाण व श्री. मधुकर माळी साहेब यांनी सेंद्रीय शेती या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच महात्मा गांधी विदयालय काटेगाव प्रशालेचे प्राचार्य श्री. किरण पाटील सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
या प्रसंगी काटेगाव व परिसरातील शेतकरी , महात्मा गांधी विदयालय काटेगाव प्रशालेचा स्टाप व विदयार्थी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. रविंद्र मोरे सर यांनी केले व आभार श्री आनंद खूने सर यांनी मानले
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले