दि. 14/09/2024 रोजी प्रशालेत मोफत सामुदायिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी, अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य, श्री थोरबोले एस.आर, प्रमुख पाहुणे डॉ. साबेर शेख, डॉ. सुजाता बनसोडे व डॉ. स्वप्निल मुंढे उपस्थित होते.

राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय, धर्मादाय सहआयुक्त,पुणे व धर्मादाय उपायुक्त, सोलापूर आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांचे संयुक्त विद्यमाने
मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर – 2024 मार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास चारे ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला..सदर शिबिरात आरोग्य तपासणीसह रक्त तपासणी, ECG, रक्तदाब इ.तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी सोबत रुग्णांना मोफत औषधांचे ही वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. माढेकर सर यांनी केले.
आरोग्य शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर्स व त्यांचे सर्व स्टाफ कार्यरत होते.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार