तुळजाभवानी नवरात्र उत्सव बाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही.देवीचे महंत,सेवेकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत. याबाबतचा जिल्हाधिकारी यांचा आदेश माहिती व जनसंपर्क कार्यालयाने कळविला आहे.
परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासाच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे. यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल,दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे.उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत.गर्दी होऊ नये व कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दररोज पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत फक्त 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.
तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यात 15 हजार भाविकांची प्रवेश मर्यादा घातल्याने आगामी काळात गर्दीवर नियंत्रण आणणे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असणार असून यामुळे गोंधळ उडनार आहे.नवरात्र उत्सवातील कोजागिरी पौर्णिमा रद्द करण्यात आली आहे तर या काळात 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात जिल्हा बंदी तर तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.पौर्णिमेला कर्नाटक,आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातुन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यामुळे या 3 दिवसात एकही भाविकाना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही.पोर्णिमेच्या आगोदर एक दिवस पोर्णिमे दिवशी व पोर्णिमे नंतर एक दिवस असे तीन दिवस तुळजापूरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.
यांना नसणार प्रवेश
तुळजाभवानी मंदीरात 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ यांना नसणार प्रवेश तुळजाभवानी मंदीरात 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक,दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती,गरोदर स्त्रिया व 10 वर्षाखालील बालके यांना प्रवेश नसणार नाही याबाबत मंदिर व्यवस्थापनाने उपाययोजना कराव्यात तसेच मास्क,सॅनिटायझर वापरावे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मंदिराच्या परिसरातील 200 मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करुन सहकार्य करावे,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी केले आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवास २ ९ सप्टेंबर रोजी मंचकी निद्राने सुरुवात झाली असुन देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली आहे.
७ ऑक्टोंबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे.
8 ऑक्टोंबर रोजी श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना.
9 ऑक्टोंबर रोजी रथअलंकार महापूजा.
10 ऑक्टोंबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा.
11 ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा.
12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा.
13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा.
14 ऑक्टोंबर रोजी घटोत्थापन.
15 रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे.
त्यांनतर १९ सिमोल्लंघन हा विधी होणार आहे . त्यांनतर १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल अशी माहिती महंत तुकोजी बुवा यांनी दिली.
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान