यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम म्हणाले की कृषी विभागाचे महाडीबीटी पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे तसेच शेतकऱ्यांना उपयुक्त अश्या अनेक योजनांचा लाभ कश्या पद्धतीने मिळू शकेल याबाबत माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक सयाजी गायकवाड यांनी भूईमूग या पिकांचे लागवडीपासून काढणीपर्यंतचे व्यवस्थापन कसे करावे याचबरोबर माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व याबाबत सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महात्मा गांधी विदयालयाचे मुख्याध्यापक किरण पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत एकत्र येऊन कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे शाश्वत शेतीचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्मवीर शेतकरी ज्ञान मंदीर काम करेल हा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रम प्रसंगी काटेगाव व परिसरातील शेतकरी , महात्मा गांधी विदयालयाचे कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते. तसेच काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रविंद्र मोरे व आभार आनंद खुणे यांनी मानले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट