Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > कौडगाव औद्योगिक क्षेत्र विकासात खीळ घालणाऱ्यांना सद्बुद्धी लाभो, ग्रामदैवत बजरंगबलीला प्रार्थना

कौडगाव औद्योगिक क्षेत्र विकासात खीळ घालणाऱ्यांना सद्बुद्धी लाभो, ग्रामदैवत बजरंगबलीला प्रार्थना

मित्राला शेअर करा

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कौडगाव औद्योगिक क्षेत्र विकासात खीळ घालणाऱ्यांना सद्बुद्धी लाभो हीच कौडगावचे ग्रामदैवत बजरंगबलीला प्रार्थना करून कौडगावचे ग्रामदैवत बजरंगबलीला महाआरती करून साकडे घातले.

जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौडगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात आली, २ टप्प्याचे भूसंपादन देखील पूर्ण झाले. ५० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर होऊन कामही सुरू झाले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे सदरील काम रेंगाळले असून टेक्निकल टेक्सटाईल हबचा प्रस्ताव देखील राज्य सरकारने प्रलंबित ठेवला आहे. जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी व येथील अर्थकारणाला बळ देण्यासाठी या औद्योगिक क्षेत्राचा विकास करून येथे मोठे प्रकल्प आणणे आवश्यक आहे. राज्याचे उद्योग मंत्री शिवसेनेचे जेष्ठ नेते, आमदार श्री.सुभाष देसाई यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे वारंवार मागणी करूनही याबाबत बैठक बोलावली जात नाही अथवा निर्णय होत नाही. त्यामुळे या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी ग्रामस्थांनी ग्रामदैवत हनुमानजींची महाआरती करून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी साकडे घातले.

सर्वांच्या साथीने कौडगाव एम.आय.डी.सी.मध्ये १,५०० एकर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असून बार्शी तालुक्यातील १,००० एकरचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. उच्चदाब वीज वाहिनी, गॅस पाईपलाईन, पाणी या पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी येथील गरज लक्षात घेऊन आपल्या मागणीप्रमाणे या भागातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्यास मान्यता दिली व एम.आय.डी.सी.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या. एम.आय.डी.सी.ने के.पी.एम.जी. संस्थेच्या माध्यमातून प्रारूप आराखडा तयार करून राज्य सरकारकडे दाखल केला. परंतु सन २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या प्रस्तावावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.

आजवर सदरील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. उद्योगमंत्री श्री.सुभाषजी देसाई यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केला,भेटून विनंती केली. अधिवेशनामध्ये सातत्याने हा विषय मांडला मात्र ना याबाबत बैठक बोलावली जाते, ना काही निर्णय घेतला जातो. उद्योग मंत्री यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे या विषयात लक्ष घालून बैठक बोलावण्याची मागणी केली, परंतु दुर्दैवाने त्यांच्या कडूनही काही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्यावर नुकतीच शस्रक्रिया झाली असून त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी, अशी देखील प्रार्थना देखील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली.

सदर विषयाबाबत येत्या १५ दिवसांच्या आत बैठक घेऊन राज्य सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा मारुतीरायाचे दुसरे नाव बलभीम आहे याची प्रचिती जनता देईल असा सज्जड इशारा याप्रसंगी आमदार पाटील यांनी आहे.

यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.