माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर भोसरे या महाविद्यालयास दि. २०डिसेंबर २१ डिसेंबर २०२१ रोजी बंगलोर येथील नॅकच्या त्रिसदस्यीय समितीने भेट दिली. सदर त्रिसदस्यीय समितीने मागील पाच वर्षात महाविद्यालयाने केलेल्या शैक्षणिक व प्रशासकीय प्रगतीचा आढावा घेतला.
सन २०२० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महाविद्यालयास “उत्कृष्ट महाविद्यालय” म्हणून दिलेला पुरस्कार तसेच प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांना दिलेला “उत्कृष्ट प्राचार्य” पुरस्कार, महाविद्यालयाच्या परिसरात बांधलेल्या प्रशस्त व सुंदर इमारती, हिरवागार रमणीय परिसर, भव्य क्रीडांगण, युजीसी अनुदानातून भव्य इंडोअर स्पोर्ट्स हॉल, सर्व प्रकारच्या क्रीडा सुविधा, आर्ट्स, कॉमर्स व सायन्स विद्याशाखेचे साठी स्वतंत्र विभाग, भव्य व ICT सोयींनीयुक्त क्लासरूम, विज्ञान शाखेसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रेडींग रूम, स्पर्धा परीक्षा केंद्र, स्पोकन इंग्लिश लैंग्वेज लॅब, विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सुविधा, संगणीकृत भव्य ग्रंथालय, प्रशासकीय कार्यालय, सुसज्ज प्राचार्य कार्यालय, प्राध्यापक कक्ष, पिण्याच्या पाण्याची R.O. प्लांटची सुविधा, स्वतंत्र स्वच्छतागृहे, अद्यावत एनसीसी, एनएसएस विभाग, विशेष एनसीसी विभागामार्फत सुमारे ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आर्मी, पोलीस इत्यादी विविध शासकीय सेवेत सर्विस, एनसीसी विभागाची उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी, सांस्कृतिक विभागाचे प्रशंसनीय काम, विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र, विविध विषयाची रिसर्च सेंटर, नेट, सेट, पीएच.डी. शैक्षणिक पात्रता धारक तज्ञ प्राध्यापक व प्रशासकीय स्टाफ, महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाज, ग्रंथालयातील संगणीकृत कामकाज, परीक्षापद्धती ICT च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना अद्ययावत पद्धतीने केलेले अध्यापन, महाविद्यालयाचा ग्रीन कॅम्पस, क्लीन कॅम्पस असा अत्यंत रमणीय परिसर इत्यादी सर्व बाबीचा मागील ५ वर्षांपासूनचा नॅक समितीने आढावा घेतला.
त्याचाच परिपाक म्हणून या समितीने महाविद्यालयास A ग्रेट प्रदान केलेली आहे. सोलापूर विद्यापीठाचा महाविद्यालयास प्रथम उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार त्यानंतर प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांना सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार आणि शेवटी नॅक समितीने महाविद्यालय दिलेला A ग्रेड चा बहुमान मिळाला आहे. एकंदरीत प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांचे हॅटट्रिक पूर्ण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे असे म्हणता येईल. प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी A ग्रेड मिळवण्यासाठी परिश्रम घेतले आहे.
महाविद्यालय अतिउच्च शिखरावर घेऊन जाण्यासाठी म्हणजेच महाविद्यालयास A ग्रेड मिळवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार श्री. विनायकराव पाटील, संस्थेचे सचिव श्री. बाळासाहेब भिसे प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील, नॅकचे समन्वयक प्रा. डॉ. सचिन लोंढे, प्रा. डॉ. थोरात एम. एस., प्रा. डॉ. राजेंद्र दास सर, प्रा. प्रमोद शहा, मा. प्राचार्य राजमाने, मा. प्राचार्य धुत्तरगाव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी प्राचार्य डॉ.महेंद्र कदम, माननीय फुलचंद धोका, मा. मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे सर, ॲड. श्रीपाल धोका, प्रा. डाॅ. दळवी सर, प्रा. डॉ. विजय काळे, माननीय संजय गोरे, प्रा. चिद्रवार सर इतर सर्व आजी-माजी विद्यार्थी इत्यादी सर्वांनी परिश्रम घेतल्यामुळे महाविद्यालयाचे A ग्रेड मिळाली आहे ही वस्तुस्थिती आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. मृणालिनी फडणवीस मॅडम, सोलापूर विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, सोलापूर विद्यापीठ प्राचार्य फोरमचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख व उपाध्यक्ष प्राचार्य जमादार सर, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व पत्रकार बंधु इत्यादींनी महाविद्यालय A ग्रेड प्राप्त झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाच्या पुढील कारकीर्दीस उत्तरोत्तर प्रगती होवो अशा शुभेच्छा दिल्या.
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान
बार्शीत रणगाडा? आमदार राजेंद्र राऊतांची कमाल..! बार्शीच्या इतिहासाला उजाळा.