Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > महाराष्ट्र विद्यालय मधील कु. वैष्णवीची महाराष्ट्र संघात निवड

महाराष्ट्र विद्यालय मधील कु. वैष्णवीची महाराष्ट्र संघात निवड

महाराष्ट्र विद्यालय मधील कु. वैष्णवीची महाराष्ट्र संघात निवड
मित्राला शेअर करा

महाराष्ट्र विद्यालय बार्शीची विद्यार्थिनी कु.वैष्णवी शिराळकर हिची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असो. यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत वैष्णवी दादासाहेब शिराळकर हीची १८ वर्षा खालील मुलीच्या गटामधून निवड झाली .सदर स्पर्धा तेलंगणा येथे डिसेंबर मध्ये होणार आहेत.

प्रा. श्री.डॉ .सुरेश लांडगे व प्रा. श्री.दिपक गुंड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा शिक्षक पाटील पी.डी. ,शिवराज बारंगुळे , आदित्य माने (राष्ट्रीय खेळाडू), अनिल पाटील , योगेश उपळकर यांचे देखील मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल वैष्णवीचे संस्थेचे अध्यक्ष बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे,सचिव पी.टी.पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य जी.ए.चव्हाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.