संपूर्ण देशात त्याचबरोबर राज्यातही कोरोना लसीकरणाची मोहिमेने जोरदार चालू आहे आहे. महाराष्ट्राने मंगळवारी 10 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टप्पा पार केला असे आरोग्यमंत्र्यानी जाहीर केले आहे. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत राज्य दुसर्या क्रमांकावर आहे पण अजुनही काही लोक लस घेण्यासाठी टाळाटाळ करताताना दिसून येतात यामधे सुशिक्षित लोकांचा सुद्धा समावेश आहे.
अनेक जिल्ह्यातून 100% लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत काही जिल्ह्यांमध्ये ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी लास घेतलेली नाही अश्या कर्मचाऱ्यांवर हजेरी बंद, पगार बंद असे आदेश ही काढण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या 25 गावांना विशेष निधी.शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वार्ड सौ प्रतिशत टीकाकरण वार्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राबवण्यात आले आहेत.
लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारकडूनही वेळोवेळी निर्देश केले जात आहेत. नागरिकांकडून लसीकरणाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा यासाठी सकारकडून अनेक युक्त्या राबवल्या जातात. तर लसीकरण वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तरच पेट्रोल,गॅस आणि रेशन मिळणार आहे.
औरंगाबादमध्ये लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. जर आता पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळवायचं असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस तरी अनिवार्य असणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.
या आदेशानुसार कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचे प्रमाणपत्र तपासुनच त्यांना पेट्रोल गॅस आणि रेशन मिळणार आहे. लसीकरणाबाबत नागरिकांत जागरूकता वाढावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी राज्य सरकारकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या.त्याचाच एक भाग म्हणुन औरंगाबादमधील लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
कुष्ठरुग्ण शोध अभियान व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवा