Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > मनोरंजन > राजर्षी शाहू विधी महाविद्यालयातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर

राजर्षी शाहू विधी महाविद्यालयातर्फे कायदेविषयक जनजागृती शिबिर

मित्राला शेअर करा

बार्शी – राजर्षी शाहू विधी महाविद्यालय, बार्शी (जि. सोलापूर) येथील विधी शाखेचे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचा जागर तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच विविध विद्यालयात जाऊन केला.

राजर्षी शाहू विधी महाविद्यालय, बार्शी तालुका विधी समिती, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तालुक्यातील शेलगाव, तांदुळवाडी, तावडी, अरणगाव, सौंदरे, कासारवाडी, बळेवाडी, भोयरे, आगळगाव, बाभुळगाव आणि वानेवाडी या गावांत तसेच महाराष्ट्र विद्यालय, शेठ अगरचंद कुंकूलोळ प्रशाला, सिल्व्हर ज्यूबली हायस्कूल, बार्शी टेक्निकल हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदरे, संत तुकाराम महाराज प्रशाला पानगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानगाव, शारदा देवी प्रशाला वैराग, कन्या प्रशाला वैराग, विद्या मंदिर वैराग, तुळशीदास जाधव प्रशाला वैराग, इ. विद्यालयातील विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहितीपत्रिका वाटप करून व जनजागृती शिबिर घेऊन कायदेविषयक मार्गदर्शन केले.

लोकन्यायालय, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार व उद्दिष्टे, अपंग व्यक्ती संबंधीचे कायदे, न्यास कायदा १९९९, वैकल्पिक वाद निवारण पद्धती, मध्यस्थी काळाची गरज, महिलांचे अधिकार व हक्क, बालकांचे अधिकार व हक्क, इ. विषयांवर सखोल माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

राजर्षी शाहू विधी महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थी केदार पाटील, राहुल मिरगणे, विजय काकडे, कर्णराज जाधव, स्नेहा निंबाळकर, कांचन क्षीरसागर यांनी तालुक्यातील खेड्यांत माहितीपत्रक वाटप व जनजागृती शिबिर घेण्याचे ठरवले.

याकामी राजर्षी शाहू विधी महाविद्यालय बार्शी येथील प्राचार्य डॉ. एम्. कृष्णमूर्ती, प्रा. डॉ. सोनकांबळे सर, प्रा. मिठ्ठा मॅडम, प्रा. शिकारे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला माहिती पत्रके वाटून तसेच कायदेशीर मार्गदर्शन शिबिर घेऊन गावागावांत विविध योजनांबाबत माहिती दिली. त्याच वेळेस येथे शिबिरासाठी उपस्थित असलेले तालुका विधी समितीचे कर्मचारी यांनीही सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.