दिनांक २२ गुरुवार रोजी. सौ. लक्ष्मीबाई मोहिते बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्यावतीने मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील वारकरी दिंडी साठी स्नान, चहा व अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती. संस्थेच्या प्रांगणात हा अल्पोपाहार व चहा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
या दिंडी साठी स्नानाची सोय उपलब्ध करून देण्यात येते तसेच चहा नाष्टा, अल्पोपाहार ही देण्यात येतो ही परंपरा कै. सौ. लक्ष्मीबाई मोहिते बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्यावतीने सामाजिक भावनेतून राबवली जाते.
संस्थेचा हा उपक्रम संस्थेच्या स्थापनेच्या पूर्वीपासून अविरतपणे चालू आहे. या वर्षी पायी दिंडीत जवळ जवळ १५० वारकरी सहभागी होते.
या वेळेस संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य दिलीप मोहिते, सचिव कविता मोहिते तसेच सर्व पदाधिकारी सदस्य व महिला सदस्य संस्थेचे हितचिंतक हजर होते कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहिल्या बद्दल कै. सौ. लक्ष्मीबाई मोहिते बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद