महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे पोलाद परिवार (भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड जालना) म्हणजेच पोलाद स्टील नावाने प्रसिद्ध बांधकामाच्या सळई चे निर्माते ) यांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना सौरमालेची थोडक्यात माहिती, प्रत्यक्ष आभासी स्वरूपात (सचित्र) खगोलशास्त्रीय ज्ञानाचा शास्त्रीय आधार देऊन चित्रफित सादर करण्यात येत आहे.

या कार्यक्रमासाठी पोलाद कंपनी कडून आलेले श्री बसवराज आलोरे व श्री. गणेश मेणसे यांचा विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के. डी. धावणे,आर. बी.सपताळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्रा विषयी जिज्ञासा आणि आवड निर्माण व्हावी हा असून या उपक्रमाचा महाराष्ट्र विद्यालयातील २२९० विद्यार्थ्यांनी विनामूल्य पाहण्याचा लाभ घेतला.
या प्रसंगी लाइन्स क्लबचे माजी अध्यक्ष तसेच पोलाद स्टीलचे बार्शी येथील डीलर अजित देशमुख, सहशिक्षक, संग्राम देशमुख उपस्थित होते.
More Stories
श्री. शि. शि. प्र. मं. सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था बार्शी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रीय उद्योजकांच्या यादीत बार्शीतील कसपटे यांचा समावेश