Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > लायन्स क्लबच्या वतीने बार्शीत शिक्षकांसाठी कार्यशाळा

लायन्स क्लबच्या वतीने बार्शीत शिक्षकांसाठी कार्यशाळा

लायन्स क्लबच्या वतीने बार्शीत शिक्षकांसाठी कार्यशाळा
मित्राला शेअर करा

बार्शी: लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन चे वतीने आंतरराष्ट्रिय संघटनेच्या लायन्स क्वेश्ट या कार्यक्रमाअंतर्गत बार्शी मध्ये दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाल्याची माहिती अध्यक्ष. ला.अमित कटारिया यांनी दिली.

लायन्स क्वेश्ट हा सामाजिक व भावनिक शिक्षण पद्धती वर आधारित शैक्षणिक कार्यक्रम असून जगभरातील ९० देशांमधे समर्थ पणे राबविला जातो. सामाजिक, भावनिक शिक्षण कौशल्याचा विकास करणे, नकारात्मक विचार, भावना ओळखून त्याचा प्रतिकार करणे तसेच सकारात्मक भावनांना प्रोत्साहित करून सर्वांगीण विकासाला बळकटी देण्यासाठी या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ला. बी. एल. जोशी यांनी दोन दिवसांच्या या कार्यशाळेला मार्गदर्शन केले. बार्शीतील विविध आठ शाळेतील ३६ शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे उद्घाघटन प्रसंगी प्रथम उप प्रांतपाल ला. एम. के. पाटील, शिक्षणाधिकारी नसीम बानु उपस्थित होते.


या कार्यशाळेचा सांगता समारोह प्रांतपाल ला. राजशेखर कापसे,प्रांतीय सचिव ला. अशोक भांजे उपस्थित होते.या प्रसंगी व्यासपीठावर प्रशिक्षक ला. बी. एल.जोशी, अध्यक्ष अमित कटारिया, आदित्य कोठारी, राजाभाऊ काळे, विनोद बुडुख, रवी बजाज,योगिता कटारिया उपस्थित होते.

आजची तरुण पिढी काळाच्या खूप पुढे असून चित्रपट सृष्टी, सोशल मीडिया, फॅशन जगत आणि सर्व प्रकारच्या माहितीशी सहज संपर्क असणारी आहे. या सगळ्याची खूप मोठी किंमत या पिढीला मोजावी लागत आहे. या साठी हा उपक्रम अतिशय उपयोगी असल्याचे मत सर्व सहभागी शिक्षकांनी या प्रसंगी व्यक्त केले. दोन दिवसांच्या या शिबिरा मध्ये सुलाखे हायस्कूल, सिल्व्हर ज्युबिली प्रशाला, सुयश विद्यालय,बार्शी टेक्निकल हायस्कूल, महारष्ट्र विद्यालय, साधना कन्या प्रशाला, या सह आठ शाळा सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्वेश्ट प्रांतीय सभापती ला. सुहास निकम, ला. योगेश कुलकर्णी, ला. वासुदेव ढगे, ला. अतुल सोनिग्रा, ला. आनंद पुनमिया यांनी परिश्रम घेतले. बार्शी शहरात प्रथमच अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल जी. ए .चव्हाण स्वामिराव हिरोळीकर, प्रशांत कोल्हे, विक्रम टकले आदी मुख्याध्यापकांनी लायन्स क्लबच्या कार्याचे अभिनंदन केले आहे.