बार्शी – दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती चे औचित्य साधून बार्शी नगरपालिकेतील आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यासाठी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे व्यसनमुक्ती या विषयावर डॉ संदीप तांबारे व सौ कविता अंधारे यांचे व्याख्यान आयोजित केले होते या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद आणि नगरपालिका प्रशासक श्री शिवाजी कांबळे उपस्थित होते.

लायन्स क्लब बार्शी टाउन तर्फे घेण्यात येणाऱ्या सेवा सप्ताह अंतर्गत व्यसनमुक्ती व्याख्यानास नगरपालिकेचे जवळपास 350 कर्मचारी उपस्थित होते.
या व्याख्यानामध्ये डॉ संदीप तांबारे यांनी दारूच्या व्यसनामुळे कशाप्रकारे तीन पिढ्यांचे नुकसान होते हे समजून सांगितले. तसेच आजच्या पिढीमध्ये फक्त दारूचे व्यसन नसून मोबाईलचे पण व्यसन आहे आणि ते किती हानिकारक आहे हे पण समजावून सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब बार्शी टाउन चे अध्यक्ष श्री अमित कटारिया, सचिव श्री आदित्य कोठारी, खजिनदार राजाभाऊ काळे व सेवा सप्ताहाचे प्रकल्प समन्वयक डॉ योगेश कुलकर्णी आणि प्रकल्प प्रमुख चंद्रकांत जाधव व डॉ मौलाना शेख ॲड. वासुदेव ढगे, रवी बजाज, उमेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले
More Stories
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन