Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > मा. खासदार राजू शेट्टी यांची शिवराम गायकवाड यांनी घेतली भेट

मा. खासदार राजू शेट्टी यांची शिवराम गायकवाड यांनी घेतली भेट

शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अन्य भोंगळ कारभार विरोधात शेतकर्यांचे महावितरण कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी दिवसा १० तास शेतीला वीज द्या या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
मित्राला शेअर करा

माळशिरस तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, वंचित-विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व तालुक्यातील विविध प्रलंबित कार्याचा आढावा घेतला व आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत योग्य त्या सुचना दिल्या जातील असेही त्यांनी आश्वासन दिले.

‘शेतकऱ्यांचे दैवत माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांची भेट घेतली’ असे शिवराम गायकवाड यावेळी म्हणाले.

यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.सौरभदादा राजु शेट्टी, शिवराम गायकवाड,स्वस्तिक पाटील,इंद्रजीत भारमल,अजित पोवार,जनार्धन पाटील,राजु पाटील,स्वप्नील माणगावे,लक्ष्मण गायकवाड आदी पदाधिकारी,महिला भगिनींही व स्वाभिमानीचे शिलेदार मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित होते.