Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > महापालिका आवारात  100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार

महापालिका आवारात  100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार

महापालिका आवारात  100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार
मित्राला शेअर करा

15 ऑगस्ट रोजी 20 बाय 30 आकाराचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात येणार

महापालिका आवारात 100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार !

सोलापूर : पारतंत्र्यातही स्वातंत्र्य उपभोगत तिरंगा ध्वज डौलाने फडकविलेल्या ऐतिहासिक सोलापूर नगरीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ उभारणीचे काम बुधवारी पूर्ण झाले.

13 ऑगस्ट रोजी 20 बाय 30 आकाराचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.

 महापालिका आवारात  “आय लव्ह सोलापूर” या सेल्फी पॉईंटच्या बाजूला दिमाखदार असा भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ आणि त्यामागे इंद्रभुवनची सुदंर इमारत असे डोळ्याचे पारणे फेडणारे मनोहारी दृश्य पाहायला मिळणार आहे. महापालिका आवारात 100 फुटी स्तंभावर तिरंगा ध्वज
कायमस्वरूपी 24 तास डौलाने फडकत राहणार आहे.

  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” उपक्रम यशस्वीतेसाठी सोलापूर महापालिका प्रशासनाची जंगी तयारी सुरू आहे. त्याचबरोबर एक आगळावेगळा उत्सव व्हावा या उद्देशातून आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या आवारात
भव्य आणि दिव्य असा 100 फुट उंच स्तंभावर 20 बाय 30 फूट आकाराचा भव्य तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात येणार आहे.

शंभर फुटी ध्वजस्तंभ उभारणीचे काम  बुधवारी पूर्ण झाले आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने बनविलेला हा भव्य असा पांढऱ्या रंगाचा लोखंडी स्तंभ आहे. यामध्ये असलेल्या विद्युत मोटारच्या साह्याने ऑटोमॅटिकली ध्वज वर खाली करण्याची सोय उपलब्ध आहे. बाजूला 2 फोकसच्या प्रकाशात परिसर उजळणार आहे.