बार्शी : ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी गेली पाच वर्षापासुन नवनवीन सामाजिक उपक्रम राबवत आहे. या वर्षी प्रथमच शिक्षक दिनानिमीत्त ओन्ली समाज सेवा आदर्श शिक्षक पुरस्कार तालूका स्तरावर देण्याचे योजले आहे.
या पुरस्कारासाठी पूढील गट प्राथमिक, माध्यमिक, मुख्याध्यापक/प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी या सर्व गटात प्रथम वर्षी फक्त १६ पुरस्कार दिले जाणार आहेत तरी शिक्षकांनी आपले प्रस्ताव ४ सप्टेंबर 2022 पर्यत समक्ष भेटुन सादर करावेत.
शिक्षक प्रस्तावात पुर्ण नाव, पत्ता, शाळा, सेवा काळ, सामाजिक कार्य, लेखन, विशेष कार्य तसेच दोन आयडेटी फोटो, स्वघोषणा कॅरक्टर प्रमाणपञ, फोन नंबर लिहलेला असावा. हे प्रस्ताव ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेचे पुरस्कार कमिटी सदस्य श्री नागनाथ वामन सोनवणे यांच्याकडे समक्ष येवुन सादर करावे. मो.9271726186 या नंबरवर संपर्क करावा. तसेच राहुल वाणी मो. ९४२३०८७०२० या नंबर वरती आपण संपर्क करावा.
या शिक्षक पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, फेटा सन्मानचिन्ह, प्रमाणपञ, असे राहील. तरी सर्वानी आपले प्रस्ताव आवश्यक कागदपञासहित ४ सप्टेंबर पर्यत सादर करावीत.आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दि ११ सप्टेंबर 2022 रोजी वार रविवार ठीक 10 वा होणार आहे
स्थळ गौतम गार्डन, रिंग रोड बार्शी या ठिकाणी संपन्न होणार आहे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल रामराव वाणी यांनी केले आहे.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न