Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय, बार्शी अजिंक्य

व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय, बार्शी अजिंक्य

व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय, बार्शी अजिंक्य
मित्राला शेअर करा

दि. 21नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विद्यालय येथे 14/17/19 वर्ष खालील मुला व मुलींच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

सदर स्पर्धांमध्ये 25 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धा मध्ये महाराष्ट्र विद्यालय 14 वर्ष/17 वर्ष मुलांचा व मुलींचा 4 संघांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर निवड झाली. या तालुकास्तरीय स्पर्धा महाराष्ट्र विद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी तालुक्यातील विविध शाळांतील व्हॉलीबॉल संघांनी सहभाग घेतला.

19 वर्ष मुले श्रीमान झाडबुके महाविद्यालय व मुली श्री. शिवाजी महाविद्यालय संघ प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर निवड झाली. सदर संघाला क्रीडशिक्षक पाटील पी.डी. सर बारंगुळे सर, आदित्य माने राष्ट्रीय खेळाडू, अनिल पाटील सर, योगेश उपळकर सर यांनी मार्गदर्शन केले.

सर्व संस्था सन्मानीय पदाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य जी. ए. चव्हाण, उपमुख्याध्यापक आर.बी सपताळे, यांनी अभिनंदन केले. या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी डॉक्टर सुरेश लांडगे व प्राध्यापक दीपक गुंड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले


महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्यातर्फे नागपूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 18 वर्षा खालील मुलींच़्या संघात पुणे विभाग विजेता ठरला. सदरच्या संघामध्ये महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी. वैष्णवी दादासाहेब शिराळकर हिचा सहभाग होता . तिने मिळवलेल्या यशाबद्दल प्रशाले कडून तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.