दिनांक २८/०१/२०२३ वार शनिवार रोजी पुणे येथे पार पडलेल्या शालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शीची खेळाडू कु. आर्या उमेश पाटील हिने दुसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले. आर्याचे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
आर्याला श्री.सचिन रणदिवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच श्री. अनिल पाटील, श्री. पी. डी. पाटील व श्री. योगेश उपळकर यांचे देखील मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल कु.आर्या पाटील चे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन.जगदाळे,सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य,सर्व संस्था सदस्य, महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य जी.ए.चव्हाण, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन