बार्शी येथील वाय पी एज्युकेशन सोसायटी संचलित शाह कन्या प्रशाला व मॉडेल हायस्कूल मध्ये नॅशनल कॅडेट कोर्स ची सुरुवात करण्यात आली.
या कोर्सेस ना मंजुरीचे पत्र कर्नल अनिल वर्मा Adm officer 9 Mah Bn NCC सोलापूर यांच्या हस्ते संस्थेचे उपाध्यक्ष मा अजय महाजन यांना देण्यात आले या वेळी कर्नल शेखर Dy कमांडट NCC Pune group हे उपस्थित होते.
शालेय स्तरावर विद्यार्थ्याना संरक्षण दलामध्ये काम करण्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने सदर विभाग सुरू करण्यात आला यासाठी अध्यक्ष चेतनभाई देसाई, उपाध्यक्ष अतुलभाई कोठारी, अजय महाजन यांनी परिश्रम घेतले या विभागाची जबाबदारी भाऊसाहेब कांबळे व अर्चना बुटे यांना देण्यात आली
या विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना मुख्याध्यापक भारत पवार, मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे, सचिव नागनाथ देवकते यांनी तसेच सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
More Stories
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय, दुचाकी मालिका सुरू- आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
कार्यकर्त्यांनी स्वता उमेदवार समजून जोमाने कामाला लागावे. आ. राणाजगजितसिंह पाटील