Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल पुणे विभागाच्या संघात बार्शीतील महाराष्ट्र विद्यालयाच्या दोघींची निवड

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल पुणे विभागाच्या संघात बार्शीतील महाराष्ट्र विद्यालयाच्या दोघींची निवड

मित्राला शेअर करा

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा उस्मानाबाद येथे दिनांक ३ ते ५ जानेवारी मध्ये पार पडल्या. सदरील स्पर्धेमध्ये १८ वर्षाखालील मुलींच्या संघात पुणे विभागाने अजिंक्यपद पटकावले. पुणे विभागाच्या संघामध्ये महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शीमध्ये शिकत असलेली कु. वैष्णवी दादासाहेब शिराळकर व कॉमर्स कॉलेज येथे शिकत असलेली कु. मृणाल प्रदीप माने या दोघींचा समावेश आहे.

विजयी खेळाडूंचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संस्थेचे अध्यक्ष बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे सचिव पी. टी. पाटील व सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे प्राचार्य जी.ए. चव्हाण व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे अभिनंदन केले संघ व्यवस्थापक म्हणून रुपाली शिंदे यांनी काम केले. विजयी खेळाडूंना विशेष मार्गदर्शक डॉ. सुरेश लांडगे व सर्व क्रीडा शिक्षक तसेच क्रिडा मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.