दिनांक १७/०४/२०२२ रविवार रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव पी. टी. पाटील व संस्थेचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. भारत सुभाष महांगडे सर (पालक प्रतिनिधी) हे होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे श्री.पी. टी.पाटील,श्री.जयकुमार शितोळे, विद्यालयाचे प्राचार्य जी. ए. चव्हाण व श्री सापताळे आर. बी. या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या पालक मेळाव्यासाठी इ ५ वी ते इ १० पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक बोलावले गेले होते. हा पालक मेळावा आयोजित करण्यामागील उद्देश विद्यालयातील श्री.आर.बी. सपताळे यांनी प्रास्ताविक करताना स्पष्ट केला.
दिनांक १८/०४/२०२२ पासून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या परवानगीने इ ५ वी ते इ १० वी चे नियमित वर्ग महाराष्ट्र विद्यालय बार्शी याठिकाणी चालू होत आहेत. तसेच संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र विद्यालय बार्शी या शाखेच्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर लावले गेले आहेत. हा प्रकल्प राबवण्यामागे विद्यालयाचा एकच उद्देश आहे कि विद्यार्थींना जास्तीत जास्त ज्ञान मिळणे व ऑडिओ, व्हिडिओ पाहुन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होणे हा आहे.
या पालक मेळावा दरम्यान अनेक पालकांनी आपल्या विद्यालयामधील चांगल्या गोष्टीची माहिती दिली व त्यांना अपेक्षित असलेल्या बाबींवर देखील आपली मते व्यक्त केली.
या कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य जी. ए. चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले करोना महामारी मध्ये दोन वर्ष प्रचंड मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे ते भरून काढण्यासाठी संस्थेच्या परवानगीने विद्यालयाने निर्णय घेतला आहे की १८ एप्रिल पासून विद्यालय नियमित भरणार आहे. यासंदर्भात सर्व पालकांनी एक मताने या निर्णयाला पाठिंबा दिला व या निर्णयाचे कौतुक देखील केले. पालकांमधून आलेल्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना वर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे सांगून त्या पालकांना अश्वस्थ केले. आपल्या विद्यालयांमध्ये सर्व प्रकारचे क्रीडा प्रकार चालू आहेत. त्यामध्ये स्विमिंग, व्हॉलीबॉल फुटबॉल, धनुर्विद्या, बुद्धिबळ इत्यादी कोणत्याही खेळामध्ये आपला पाल्य भाग घेऊ शकतो. विद्यालयातील खेळाडूंनी नॅशनल लेवल पर्यंत यश संपादन केले आहे तसेच विद्यालयात घेतले जाणाऱ्या ५ वी व ८ वी स्कॉलरशिप, एन.एन.एम.एस, एन.टी.एस, के.टी.एस या परीक्षेचे जादा तास व त्यावर आधारित सराव चाचण्या घेतल्या जातात याविषयी माहिती दिली.
संस्थेचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षण कसं असावे हे सांगून एक चारोळी सादर केली.
पुढे संस्थेचे सचिव पी.टी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व पालकांनाचा समावेश करून घेत त्यांच्याशी हितगुज केल.आपल्या मुलांकडून मोबाईल काढून घ्यावेत त्यांना मोबाईल, टेलिव्हिजन पासून दूर ठेवा.विद्यालयामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन केले जाणार आहे. त्यांच बरोबर १८ एप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत आपल्या पाल्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करून घेतल्या जातील आणि दिनांक २/५/२०२२ पासून पुढील वर्गाचे अध्यापनला सुरुवात केली जाईल असे ते म्हणाले. कार्यक्रमात अध्यक्ष समारोप करताना श्री. संतोष महांगडे सरांना शाळेतील स्टाफ अत्यंत चांगला आहे सर्व शिक्षक आपापली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत आम्हाला जर काही सुचवायचे असेल तर आम्ही त्या त्या वेळेस सांगू आपले विद्यालय खरच खूपच चांगले आहे असे बोलून कार्यक्रमाची सांगता केली.
या पालक मेळावा साठी ५६० पालकांनी आपली उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुहासिनी शिंदे मॅडम व आनंद कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री के. जी. मदने सरांनी केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद