सोलापूर:- महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीम हा क्रिकेट सामना तीन डिसेंबर रोजी सोलापूर येथे होणार आहे या सामन्यांमधून रणजी सामन्यासाठी क्रिकेट खेळाडूंची निवड होणार आहे. या सामन्यापूर्वी पार्क स्टेडियम चे सर्व काम पूर्ण होईल आणि राहिलेल्या त्रुटीही पूर्णत्वास येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.

19 वर्षाखालील खेळाडूंचा महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीम क्रिकेट सामना 3 डिसेंबर रोजी पार्क स्टेडियमवर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी पार्क स्टेडियमची पाहणी केली. महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीम हा चार दिवसांचा क्रिकेट सामना होणार आहे. या सामन्यांमधून रणजी सामन्यासाठी क्रिकेट खेळाडूंची निवड होणार आहे. या सामन्यासाठी अनेक खेळाडू येणार आहेत.
या सामन्याच्या पार्श्वभूमीवर मा. महापालिका आयुक्त पि. शिवशंकर व सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी पार्क स्टेडियमची पाहणी करून चर्चा केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक असणाऱ्या बाबीं संदर्भात संबंधितांना आदेश देण्यात आले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ