Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा, प्रसन्न जगदाळेस फिडे मानांकन

बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा, प्रसन्न जगदाळेस फिडे मानांकन

बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा, प्रसन्न जगदाळेस फिडे मानांकन
मित्राला शेअर करा

बार्शी : येथील महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी बुद्धिबळपटू प्रसन्न विद्याधर जगदाळे याने ‘ऑल इंडिया ओपन फिडे रेटिंग’ स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त असलेल्या खेळाडूंना बरोबर रोखत यश संपादन केले. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या अहमदनगर, औरंगाबाद येथील खेळाडूंना बरोबरीत रोखले तर पुणे व जळगाव येथील खेळाडूंवर मात करत प्रसन्न जगदाळेने हे उत्तुंग यश संपादन केले.

प्रसन्नच्या यशामुळे बार्शीच्या क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे नंतर प्रसन्न जगदाळे याचे नाव आता जगाच्या नकाशावर कोरले जाणार आहे. अहमदनगर येथे दि. ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ‘ऑल इंडिया ओपन रेटिंग’ स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त असलेले औरंगाबादचे डॉ. सुरेश रावते व अहमदनगर येथील लाल गोविंद कोलपेक व बागुल विनीत यांना बरोबरीत रोखले.

आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त जळगावचे सोमवंशी नथू, नगरचे बलभीम कांबळे आणि पुण्याचे कृष्णा भोईटे यांना पराजित करून आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले. प्रसन्न जगदाळे याने यापूर्वीही सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव आदी ठिकाणी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये यश मिळवत आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे. प्रसन्नचे प्रशिक्षक अनुप देशमुख मार्गदर्शन करत आहेत. या यशाबद्दल त्याचे बार्शी चेस ग्रुपचे नितीन अग्रवाल, बी. के भालके उलभगत, श्री. गोरे, श्री रेवडकर, श्री. भानवसे, उपळकर, पाटील यांनी अभिनंदन केले.