Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > महाराष्ट्राला मिळाले २१९ राष्ट्रीय महामार्ग , सोलापूर जिल्ह्याला सर्वात जास्त १,१७८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग

महाराष्ट्राला मिळाले २१९ राष्ट्रीय महामार्ग , सोलापूर जिल्ह्याला सर्वात जास्त १,१७८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग

महाराष्ट्राला मिळाले २१९ राष्ट्रीय महामार्ग , सोलापूर जिल्ह्याला सर्वात जास्त १,१७८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग
मित्राला शेअर करा

महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, नागपूर, रायगड, बुलडाणा, बीड, अहमदनगर आणि जालना या शहरांत राष्ट्रीय महामार्गांची सर्वाधिक कामे सुरू आहेत. महाराष्ट्राला २१९ राष्ट्रीय महामार्ग मिळाले असून, ३४ शहरांना जोडणाऱ्या या महामार्गांची लांबी १८,०६३ किलोमीटर आहे. यातील सर्वात जास्त १,१७८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्याला मिळाले आहेत. कामे लवकर पूर्ण करण्यासाठी परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

१८,०६३ किलोमीटर पैकी सर्वाधिक १,१७८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्याला मिळाले असून. त्याखालोखाल सांगली ( १,१४० ) पुणे, ( ९०५ कि.मी. ), नांदेड ( ८६० कि. मी. ) अहमदनगर ( ८३५ कि.मी. ) आणि नागपूर ( ७९४ कि.मी. ) यांचा क्रमांक लागला. ६७५ किलोमीटरसह औरंगाबादला यात सिंहाचा वाटा मिळाला असून, जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४६५ किलोमीटरचे ६ महामार्ग गेले आहेत. महामार्गांची कामे लवकर व्हावीत यासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने विविध पावले उचलली आहेत.