Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त महाराष्ट्र विद्यालयात तालुका कृषी पर्यवेक्षक सयाजीराव गायकवाड यांचे शेतीविषयक व्याख्यान संपन्न

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त महाराष्ट्र विद्यालयात तालुका कृषी पर्यवेक्षक सयाजीराव गायकवाड यांचे शेतीविषयक व्याख्यान संपन्न

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त महाराष्ट्र विद्यालयात तालुका कृषी पर्यवेक्षक सयाजीराव गायकवाड यांचे शेतीविषयक व्याख्यान संपन्न
मित्राला शेअर करा

बार्शी : आज रविवार दिनांक १४/०८/२०२२ रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी याठिकाणी स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.

प्रथम डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तालुका कृषी पर्यवेक्षक सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यां अमित दास याने आपले मनोगत व्यक्त केले. अमृत महोत्सव निमित्त आयोजित जलतरण स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच तसेच जलतरण तलाव व्यवस्थापक सुंदर लोमटे यांचाही सत्कार करण्यात आला.

यानंतर तालुका कृषी पर्यवेक्षक सयाजीराव गायकवाड यांचे आजचे आधुनिक शेती तंत्रज्ञान याविषयी व्याख्यान संपन्न झाले यावेळी त्यांनी रासायनिक खतांचा अतिरेक व सेंद्रीय शेतीचे महत्व याविषयी माहिती दिली व कृषी शिक्षणाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य जी. ए. चव्हाण, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, उपप्राचार्य एल.डी. काळे, किमान कौशल्य विभाग प्रमुख प्रा. किरण गाढवे, वरीष्ठ लिपीक रमेश चौरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एन कसबे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जे. एम. तांबोळी सर यांनी केले