मुंबई, दि. 17- माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8 कोटी 50 लाख निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
![](https://i0.wp.com/kranti-news.in/wp-content/uploads/2021/11/GR-Mahila-balkayan-.jpg?resize=640%2C853&ssl=1)
मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना लागू करण्यात आली आहे.
या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ