बार्शी : मानस विजय अंधारे याने समुपदेशनाच्या पहिल्या फेरीत अखिल भारतीय कोट्यातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर या देशातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.
मानसला NEET परीक्षेत 702 गुण 99.98 टक्के मिळाले होते. सोलापूर केंद्रातूनही तो टॉपर आहे. देशभरातील 23.8 लाख विद्यार्थ्यांपैकी त्याची रँक सामान्य श्रेणीत 521 आहे. देशातील टॉप 1000 विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमुळे अत्यंत प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालय AIIMS मध्ये प्रवेश मिळतो. एम्स हे अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय मानले जाते.
या महाविद्यालयात सर्व अत्याधुनिक सुविधा असूनही शुल्क रु. 5850. भविष्यात हृदयरोग तज्ञ म्हणून उच्च शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न आहे. मानस विजय अंधारे हा बार्शीचे सुपुत्र. डॉ. विजय अंधारे हार्ट सर्जन यांचा मुलगा आहे, आई अश्विनी विजय अंधारे चाइल्ड बिहेवियर थेरपिस्ट आणि ऑटिस्टिक मुलांसाठी पालक समुपदेशक आहेत आणि आहारतज्ञ म्हणूनही काम करतात. बार्शी येथील सुप्रसिद्ध एम. डी. डॉ.संजय अंधारे हे मानसचे काका आहेत. ह्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!