Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > हुतात्मा स्मृतिदिन, इतिहास सोलापूरच्या हुतात्म्यांचा

हुतात्मा स्मृतिदिन, इतिहास सोलापूरच्या हुतात्म्यांचा

हुतात्मा स्मृतिदिन, इतिहास सोलापूरच्या हुतात्म्यांचा
मित्राला शेअर करा

१२ जानेवारी १९३१ रोजी देण्यात आली फाशीची शिक्षा

स्वातंत्रपूर्व काळापासून स्वातंत्र मिळवण्याआधी सोलापूरचे महत्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. सोलापूरच्या नागरिकांना तीन दिवस म्हणजे शके १९३० ला मे ९, १०, ११ स्वातंत्र मिळाले. मे १९३० ला महात्मा गांधी यांना अटक झाली. संपूर्ण भारतभर ब्रिटिश नियमाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात मोर्चे व आंदोलन देखील सोलापूरात करण्यात आले. पोलिसांच्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला.

यामुळे प्रक्षुब्ध जमावाने चपळ स्टेशनवर हल्ला केला. पोलिस आणि अन्य अधिकारी सोलापूर शहराच्या बाहेर पळत होते. या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी राष्ट्रीय सभेच्या नेत्याच्या खांद्यावर होती. त्यानंतर इतर राष्ट्रीय सभेचे नेते रामकृष्ण जाजू यांनी १९३० मे मध्ये ९, १०, ११ या तीन दिवसांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखली. स्वातंत्र्यापूर्वीच इसवी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती.

याचा थोडक्यात इतिहास म्हणजे महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेवून सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे जेष्ठ स्वातंत्रसैनिक अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती.

या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोलापूर येथे मार्शल लाँ घोषित केले. अनेक नेत्यांना व निर्दोष नागरिकांना खोट्या आरोपाखाली अटक केली.

स्वातंत्रसैनिक मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना मंगळवार पेठ पोलिस ठाण्यामध्ये दोन पोलिसांच्या हत्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. निम्न न्यायालयाने या स्वातंत्र्यसैनिकांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायलनाने पण वरील शिक्षा कायम ठेवली व या चार स्वातंत्र्यसैनिकांना आजच्या दिवशी म्हणजेच १२ जानेवारी १९३१ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली.

या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर म्हणून सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे बसवण्यात आले व त्या स्थानाला हुतात्मा चौक असे नामकरण करण्यात आलेले आहे.

अशा महान हुतात्म्यांना समस्त सोलापूरकरांच्या वतीने विनम्र अभिवादन!