Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > मंत्री नवाब मलिक यांचे उस्मानाबादेतील 150 एकर जप्त

मंत्री नवाब मलिक यांचे उस्मानाबादेतील 150 एकर जप्त

मलिक कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुमले जवळा येथे असलेली 150 एकर जमीन ईडीने जप्त केली केली आहे.
मित्राला शेअर करा

भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी काही महिन्यापूर्वी तक्रार करत नवाब यांची जमीन उस्मानाबादमध्ये हे प्रकरण समोर आणत बेनामी संपत्ती बाबत गंभीर आरोप केले होते. उस्मानाबाद मध्ये नवाब मलिक यांची 150 एकर जमीन व त्यात असनारे फार्म हाऊस याची सर्वत्र चर्चा होती.

मंत्री नवाब मलिक यांना ईडीने दणका दिला आहे, मलिक कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुमले जवळा येथे असलेली 150 एकर जमीन ईडीने केली केली आहे. जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून जमीन खरेदी केली शिवाय मलिक हे शेतकरी नसताना त्यांनी बोगस कागदपत्रे तयार करून ही जमीन खरेदी केली. मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान, फराज नवाब मलिक व बुश्रा फराज या नावाने जमीन खरेदी केली आहे. जमीन् बागायती असताना कोरडवाहू जमीन दाखवून मूल्यांकन 1 कोटी 20 लाखाने कमी केले आहे. कागदोपत्री 2 कोटी 7 लाखला जमीन खरेदी केल्याचे नमूद केले मात्र प्रत्यक्षात जास्त रक्कम दिली गेल्याचा आरोप आहे. 150 एकर जमीन खरेदी करताना आला पैसा कुठून ? हा पैसा बेनामी असल्याचा आरोप असून ही संपत्ती जप्त केली आहे. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करत जप्तीची कारवाई केली.

ईडीने जप्त केलेल्या 150 एकर जमिनीत एक मोठा दुमजली बंगला आहे शिवाय जनावरांचा गोठा आहे मागे याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत होता. यात त्या शेतात व फार्म हाऊस वर काम करणारा कामगार याबाबत माहीती सांगताना दिसून येतो.

जमीन खरेदी वेळी मूल्यांकन कमी दाखविण्यासाठी हा बंगला कागदावर दाखविण्यात आला नव्हता.