गेली अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या बार्शी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी तसेच बस स्थानक सुसज्ज व प्रशस्त व्हावे यासाठी परिवहन विभागाकडे निधीची मागणी केली होती त्यानुसार परिवहन खात्याकडून तब्बल १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

सदर मंजूर झालेल्या निधी मधून फलाट, वाहतूक नियंत्रण कक्ष, रिझर्व्हेशन, पास सेक्शन, पार्सल ऑफीस, चालक / वाहक विश्रांतीगृह, महीला विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, प्रसाधनगृह इ. समावेश करण्यात आलेला आहे व आगारामध्ये गाळे, आगार व्यवस्थापक केबिन, आस्थापना केबिन, टायर रुम, इंधन रुम, कार्यशाळा, अधिक्षक कक्ष, बॅटरी रुम, कार्यशाळा महिला/ पुरुष विश्रांतीगृह, काँक्रीटीकरण, कुंपनभिंत इत्यादी विकासात्मक कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
परीवहन विभागाकडून मंजूर झालेल्या १४ कोटी ९९ लाख ५० हजार एवढ्या भरीव निधीतून सुसज्ज असे बसस्थानक दिमाखात बार्शी येथे उभे राहणार असून नागरिकांची व प्रवाशांची सोय तर होणार आहेच परंतु यामुळे बार्शी शहर व तालुक्याचा वैभवात देखील भर पडणार आहे.
सदरील बसस्थानकाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बार्शी तालुक्यातील नागरीकांच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांनी आभार मानले.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी