जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सर्व प्रांताधिकारी यांच्याकडून प्रत्येक ठिकाणची कोरोनाची परिस्थिती आणि शाळा सुरू करण्याबाबतची मते जाणून घेतली. शाळा सुरू करण्याबाबत पालकांच्या मागण्या येत आहेत, पंढरपूर, माळशिरस, बार्शी तालुके सोडले तर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे मत प्रांताधिकाऱ्यांनी नोंदवले
प्राधिकरणने शासनाने कोरोनाविषयक घालून दिलेले नियम
पाळून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सक्तीने मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर, हात वारंवार साबणाने धुणे, शाळेतील स्वच्छता या अटीवर शाळा सुरू करण्यात येणार आहेत, असे श्री.मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
ज्यांचे पाल्य शाळेत जात आहे, त्या पालकांना कोरोनाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. तसेच घरातील १५ वर्षांवरील सर्वांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे, अशा सूचनाही देण्यात येणार आहेत. तसेच शाळेमध्ये कोरोनाविषयक त्रिसूत्रीच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी फिरत्या पथकाद्वारे केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांनी दिली.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे, जि.प.चे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, मनपाचे कादर शेख आदी उपस्थित होते.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत