Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > मुदत संपलेल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या प्रशासक पदी तहसिलदार व मुख्याधिकारी यांची नियुक्ती

मुदत संपलेल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या प्रशासक पदी तहसिलदार व मुख्याधिकारी यांची नियुक्ती

मित्राला शेअर करा

संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड १९ च्या राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदीनुसार उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व मुख्याधिकारी यांची मुदत संपलेल्या संबंधित नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रशासक पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींची मुदत संपताच तेथे तरतुदीनुसार संबंधित उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी व सदर साक्षम अधिकान्यांना प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचित करण्याचे तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत देखील सूचित सूचित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या संदर्भातील आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार महेश पाठक प्रधान सचिव यांनी काढले आहेत.